IND vs NZ WTC Final 2021 Day 6: पहिल्या सत्रात टीम इंडियाचा दबदबा, Rishabh Pant याची फटकेबा; न्यूझीलंडविरुद्ध 98 धावांची आघाडी

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या सहाव्या, राखीव दिवसाच्या पहिल्या सत्रात रिषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने तीन महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या पण 5 बाद 130 धावांपर्यंत मजल मारली आणि न्यूझीलंडविरुद्ध 98 धावांची आघाडी घेतली आहे.

रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021 Day 6: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या सहाव्या, राखीव दिवसाच्या पहिल्या सत्रात रिषभ पंतच्या  (Rishabh Pant) फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) वर्चस्व गाजवलं आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने तीन महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या पण 5 बाद 130 धावांपर्यंत मजल मारली आणि न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) 98 धावांची आघाडी घेतली आहे. निर्णायक दिवसाच्या लंचची घोषणा झाली तेव्हा भारताकडून रिषभ पंत 28 धावा आणि रवींद्र जडेजा 12 धावा करून खेळत होते. दुसरीकडे, किवी संघासाठी पहिल्या सत्रात काईल जेमीसनने (Kyle Jamieson) 2 तर ट्रेंट बोल्टने 1 विकेट काढली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement