IND vs NZ 3rd Test 2024 Day 2 Live Score Update: 100 धावावर पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत, रविंद्र जाडेजाने दिले लागोपाठ दोन धक्के

न्यूझीलंडचा संघाचा पहिला डाव 235 धावांवरच आटोपला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने 82 आणि विल यंगने 71 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने 5 आणि वॉशिंग्टन सुंदरने 4 विकेट घेतल्या.

IND vs NZ 3rd Test 2024 Day 2 Live Score Update: 100 धावावर पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत, रविंद्र जाडेजाने दिले लागोपाठ दोन धक्के

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Match Scorecard:   भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series)  शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर  (Wankhede Stadium)  खेळला जात आहे.   न्यूझीलंडचा संघाचा पहिला डाव 235 धावांवरच आटोपला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने 82 आणि विल यंगने 71 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने 5 आणि वॉशिंग्टन सुंदरने 4 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट गमावून 86 धावा केल्या होत्या. आज भारताचा पहिला डाव 262 वर आटोपला. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 90 धावांची खेळी केली तर एजाज पटेलने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या होत्या. यानंतर भारताकडे 28 धावांची आघाडी होती. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकांत कर्णधार टॉम लॅथम बाद झाला. यानंतर डेव्हन कॉनवे आणि विल यंगने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंरतू कॉनवे सुंदरने 22 धावांवर बाद केले. यानंतर फलंदाजीला आलेल्या रचिन रविंद्रला अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. डॅरेल मिचेल आणि विल यंगने चांगली भागिदारी केली. पंरतू डॅरेल मिचेलला (21) जाडेजाने बाद केले यांनतर फलंदाजीला आलेल्या टॉम ब्लूडंललाही (4) जाडेजाने स्वस्तात बाद केले.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 02, 2024 04:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).