IND vs NZ 2nd Test 2024 Playing XI: दुसऱ्या कसोटीत 'या' भारतीय दिग्गज खेळाडूंना मिळाली संधी, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर केएल राहुल, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज हे भारतीय संघाबाहेर आहेत. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाश दीप प्लेइंग इलेव्हनमध्ये आले आहेत.
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्या आजपासून सुरुवात होत आहे. सध्या, भारतीय संघ या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे, कारण बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्यांना 8 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार असून मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये रोमांचक कसोटी सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर केएल राहुल, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज हे भारतीय संघाबाहेर आहेत. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाश दीप प्लेइंग इलेव्हनमध्ये आले आहेत.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल, विल्यम ओरोरके
2nd TEST.India Playing XI: R Sharma (c), Y Jaiswal, V Kohli, R Pant (wk), S Gill, S Khan, R Jadeja, R Ashwin, A Deep, W Sundar, J Bumrah. https://t.co/3vf9Bwzgcd #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 24, 2024
2nd TEST. New Zealand Playing XI: T Latham (c), D Conway, W Young, R Ravindra, D Mitchell, T Blundell (wk), G Phillips, T Southee, M Santner, W O'Rourke, A Patel. https://t.co/3vf9Bwzgcd #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

