IND vs NZ 2nd T20I: किवींविरुद्ध टीम इंडियाने तगडा गोलंदाज उतरवला मैदानात, माजी दिग्गज क्रिकेटपटूने दिली डेब्यू कॅप, पहा Video

त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप काबीज केली होती. भारतीय कर्णधार रोहित शर्माने मालिकेत सलग दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड संघ पहिले फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

हर्षल पटेलला आंतरराष्ट्रीय डेब्यू कॅप (Photo Credit: Twitter/ICC)

रांची (Ranchi) येथे न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand0 मालिकेच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) आयपीएल (IPL) 2021 मध्ये आपले गोलंदाजी कौशल्य दाखवणारा तडाखेबाज गोलंदाज हर्षल पटेलला (Harshal Patel) आंतरराष्ट्रीय पदार्पणची संधी दिली आहे. पटेलला भारताचा दिग्गज माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने (Ajit Agarkar) डेब्यू कॅप देत संघात स्वागत केले.