IND vs NZ 1st Test: चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर Shreyas Iyer बनला टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटर नंबर 303, दिग्गज क्रिकेटपटूने केले संघात स्वागत (Watch Video)

अय्यरला माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी डेब्यू कॅप देत संघात स्वागत केले. अय्यरने 2017 मध्येच मर्यादित षटकांमध्ये पदार्पण केले होते, परंतु कसोटी क्रिकेटपटू बनण्याचे त्याचे स्वप्न आता चार वर्षांनी पूर्ण झाले आहे.

श्रेयस अय्यर कसोटी डेब्यू (Photo Credit: Twitter/ICC)

कानपूरच्या (Kanpur) ऐतिहासिक ग्रीनपार्क स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) मालिकेने श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) कसोटी कारकिर्दीची सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे. श्रेयसचा आज भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला असून तो भारतासाठी कसोटी पदार्पण करणारा 303 वा खेळाडू ठरला. अय्यरने 2017 मध्येच मर्यादित षटकांमध्ये पदार्पण केले होते, परंतु कसोटी क्रिकेटपटू बनण्याचे त्याचे स्वप्न आता चार वर्षांनी पूर्ण झाले आहे.