IND vs NZ 1st Test Day 3: रिद्धिमान साहाच्या जागी KS Bharat कानपुरच्या ग्रीन पार्कमध्ये विकेकीपिंगला उतरला, जाणून घ्या काय आहे कारण

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाची कानपुरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीला एक थक्क करणारे दृश्य चाहत्यांना दिसले. संघाचा विकेटकीपर रिद्धिमान साहा मैदानात उतरला नाही आणि त्याच्या जागी श्रीकर भरत (KS Bharat) ग्लोव्हज परिधान करून विकेटकिपिंग करताना दिसला आहे. बीसीसीआयने याबाबत एक मोठा अपडेट दिला.

श्रीकर भरत आणि रिद्धिमान साहा (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st Test Day 3: न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) कानपुर कसोटीच्या (Kanpur Test) तिसऱ्या दिवशी भारताकडून रिद्धिमान साहाच्या जागी श्रीकर भरत (KS Bharat) विकेटकीपर म्हणून मैदानात उतरला आहे. साहाच्या मानेला दुखापत असून वैद्यकीय पथक त्याच्यावर उपचार करत असून त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असल्याचे वृत्त बीसीसीआयने दिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now