IND vs NZ 1st Test: भारत दौऱ्यावर न्यूझीलंडने सलग चौथा टॉस गमावला, जिमी नीशम म्हणाला- ‘कोणी नाणे तपासा’
न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून पहिल्या तीन आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांनंतर किवी संघाने कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही नाणेफेक गमावली. पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये संघाचा कर्णधार टिम साउदी होता, तर शेवटच्या सामन्यात मिचेल सँटनर कर्णधार होता. तर केन विल्यमसनने टी-20 मालिकेतून माघार घेतली होती.
न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर (New Zealand Tour of India) चौथा सामना खेळत आहे. पहिल्या तीन आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांनंतर किवी संघाने कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही नाणेफेक गमावली. चार सामन्यांमध्ये किवी संघाचे तीन कर्णधार नाणेफेकीला मैदानात उतरले, पण कोणीही नाणेफेक जिंकू शकले नाही, याविषयी किवी अष्टपैलू जिमी नीशमने (James Neesham) एक मजेशीर ट्विट केले. नीशमने ट्विटरवर लिहिले, ‘कुणीतरी जवळून नाणे तपासून पाहिलं का?’
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)