IND vs NZ 1st Test Day 4: टीम इंडियाला मोठा झटका, Kyle Jamieson ने दूर केला अश्विनचा अडथळा
IND vs NZ 1st Test Day 4: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने आपली तिसरी विकेट घेत टीम इंडियाला दुसऱ्या डावात सहावा जोरदार झटका दिला आहे. श्रेयस अय्यरच्या साथीने संघाचा डाव सावरत असलेल्या आर अश्विनचा त्रिफळा उडवून किवी गोलंदाजाने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अश्विन 32 धावा करून माघारी परतला. अश्विन आणि श्रेयसमध्ये 52 धावांची भागीदारी झाली होती.
कानपुरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला असून न्यूझीलंडचा (New Zealand) वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने (Kyle Jamieson) लंच-ब्रेकनंतर आर अश्विनला (R Ashwin) 32 धावांवर माघारी धाडलं. यासह भारताने सहावा गडी गमावला आहे. तसेच त्यांनी किवी संघावर 156 धावांची आघाडी घेतली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)