IND vs NZ 1st Test Day 2: अर्धशतक झळकावल्यानंतर Ravindra Jadeja क्लीन बोल्ड, भारताचा निम्मा संघ तंबूत परतला
भारताला दुसऱ्या दिवसाचा पहिला धक्का रवींद्र जडेजाच्या रूपात बसला आहे. किवी वागावें गोलंदाज टिम साउदीने अर्धशतक करून खेळत असलेल्या जडेजाला बोल्ड करून त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. यासह साउदीने जडेजा-श्रेयस अय्यर यांच्यामधील 121 धावांची भागीदारी मोडली.
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताला दुसऱ्या दिवसाचा पहिला धक्का रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) रूपात बसला आहे. जडेजाने 112 चेंडूंत सहा चौकारांसह 50 धावा केल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)