IND vs NZ 1st T20I 2021: रोहित शर्माचे 9 वर्ष जुने ट्विट व्हायरल, ‘हिटमॅन’चा जयपूरशी आहे विशेष संबंध
रोहित शर्मा भारतीय संघात पूर्णवेळ टी-20 कर्णधारपदाची सांभाळण्यास सज्ज असताना त्याचे एक 9 वर्षांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. रोहितने त्याच्या कारकिर्दीचा नवा अध्याय जयपूरमध्ये सुरू केला, जे योगायोगाने तेच शहर आहे जिथे 2012 मध्ये या सलामी फलंदाजाने पहिल्यांदा मुंबईच्या रणजी संघाचे नेतृत्व केले होते.
IND vs NZ 1st T20I 2021: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) बुधवारी जयपूरमध्ये आपल्या तीन टी-20 पैकी पहिल्या सामन्यात न्यूझीलंडशी (New Zealand) भिडणार आहे. या प्रसंगी रोहित शर्माने (Rohit Sharma) झटपट क्रिकेट संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्या सामन्याची सुरुवात केली. प्रसंगी, ‘हिटमॅन’चे 9 वर्ष जुने एक ट्विट, जे सध्याच्या परिस्थितीत पूर्णपणे फिट बसते, व्हायरल झाले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)