IND VS NEP Indian Players Drop Easy Catches: नेपाळविरुद्धच्या आशिया कप सामन्यात श्रेयस अय्यर, विराट कोहली आणि इशान किशनने सोडले सोपे झेल, चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया, पाहा ट्विट
चाहत्यांनी ट्विटरवर भारताच्या क्षेत्ररक्षणाच्या सुमार कामगिरीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारत सध्या कँडीच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया कप 2023 मध्ये नेपाळशी खेळत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नेपाळकडून फलंदाजीसाठी आलेले सलामीवीर कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख हे होते. भुर्तेलने पहिल्याच षटकात एका चेंडू स्लिपमध्ये गेला पण श्रेयस अय्यरने त्याचा झेल सोडला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या षटकात आसिफ शेखने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर विराट कोहलीजवळ एक सोप्पा कॅच दिला आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने तो सोडला. त्यानंतर इशान किशननेही विकेटच्या मागे झेल सोडला. चाहत्यांनी ट्विटरवर भारताच्या क्षेत्ररक्षणाच्या सुमार कामगिरीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पाहा ट्विट्स -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)