IND vs ENG 4th T20I 2025 Live Toss Update: चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडच्या पदरी नाणेफेक, भारताला फलंदाजीसाठी केले अंमत्रित; रिंकू सिंगचे पुनरागमन
तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. दरम्यान, चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा टी-20 सामना (IND vs ENG 4th T20I 2025) आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळला जाईल. सामन्याला संध्याकाळी 7.00 वाजता सुरुवात होईल. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांमध्ये बदल झाले आहेत. इंग्लंडने वूडच्या जागी महमूद आणि स्मिथच्या जागी बेथेलचा समावेश केला आहे. भारतीय संघात, अर्शदीपने मोहम्मद शमीची जागा घेतली आहे, रिंकू सिंगने जुरेलची जागा घेतली आहे आणि शिवम दुबेने वॉशिंग्टन सुंदरची जागा घेतली आहे.
चौथ्या टी-20 सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ: संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती
इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ: फिलिप साल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद
4th T20I. England won the toss and elected to field. https://t.co/RmBLGBKcGd #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 31, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2025 06:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

