IND vs ENG 2021: रिषभ पंत याच्यानंतर टीम इंडियाचा सहाय्यक कर्मचारीही COVID-19 संक्रमित
“भारतीय क्रिकेट संघाचे थ्रोडाउन तज्ज्ञ दयानंद गारानी इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरस संक्रमित आढळले आहेत, त्या तुकडीतील दोन इतरांनाही क्वारंटाईन केले गेले,” वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे.
IND vs ENG 2021: रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) थ्रोडाउन तज्ञ दयानंद गारानी (Dayanand Garani) यांचीही कोविड-19 चाचणी सकारात्मक आली आहे, अशी माहिती वृत्तसंस्था PTI ने गुरुवारी दिली. “भारतीय क्रिकेट संघाचे थ्रोडाउन तज्ज्ञ दयानंद गारानी इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरस संक्रमित आढळले आहेत, त्या पथकातील दोन इतरांनाही क्वारंटाईन केले गेले,” वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे. दरम्यान, पीटीआयने नमूद केलेल्या बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रानुसार पंतला आठ क्वारंटाईन केले आहे आणि सध्या तो असिम्प्टोमॅटिक आहे.