IND vs ENG 1st ODI 2021: पुण्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या धावांचा पाठलाग करताना खांद्याला दुखापत झाल्यानंतर फलंदाज श्रेयस अय्यर मैदानातून बाहेर पडल्याने मंगळवारी भारताला मोठा धक्का बसला. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी फलंदाजी करताना उजव्या कोपऱ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा देखील फिल्डिंगसाठी मैदानात उतरला नाही. बीसीसीआने दोन्ही खेळाडूंच्या दुखापतीबाबत अपडेट जाहीर करत म्हटले की, “क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरला 8व्या ओव्हरमध्ये डाव्या खांद्यावर दुखापत झाली. त्याला पुढील स्कॅनसाठी घेण्यात आले आहे आणि तो या गेममध्ये आणखी भाग घेत नाही. फलंदाजी करताना रोहित शर्माला उजव्या कोपऱ्याला फटका बसला आणि नंतर त्याला थोडा त्रास जाणवला. तो मैदानात उतरणार नाही.”
UPDATE - Shreyas Iyer subluxated his left shoulder in the 8th over while fielding. He has been taken for further scans and won't take any further part in the game.
Rohit Sharma was hit on the right elbow while batting and felt some pain later. He won't take the field.#INDvENG pic.twitter.com/s8KINKvCl4
— BCCI (@BCCI) March 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)