IND vs BAN, Women's World Cup 2022: यास्तिका भाटिया हिने ठोकले अर्धशतक, भारताने बांगलादेशसमोर ठेवले 230 धावांचे लक्ष्य

आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशसमोर 230 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून यास्तिका भाटियाने अर्धशतक झळकावले. भारताने 50 षटकांत 7 विकेट गमावून 229 धावा केल्या.

IND vs BAN, Women's World Cup 2022: यास्तिका भाटिया हिने ठोकले अर्धशतक, भारताने बांगलादेशसमोर ठेवले 230 धावांचे लक्ष्य
यास्तिका भाटिया (Photo Credit: Twitter/BCCIWomen)

IND W vs BAN W, World Cup 2022: यास्तिका भाटिया (Yastika Bhatia) हिचे अर्धशतक आणि पूजा वस्त्रकर (Pooja Vastrakar)-स्नेह राणा यांच्या छोटेखानी योगदानाच्या जोरावर भारताने आयसीसी महिला विश्वचषकच्या (ICC Women's World Cup) 22 व्या सामन्यात 50 षटकांत 7 विकेट गमावून 229 धावा केल्या आणि बांगलादेश महिलांपुढे (Bangladesh Women) 230 धावांचे टार्गेट ठेवले आहे. संघ अडचणीत असताना यास्तिकाने 50 धावा केल्या. तर शेफाली वर्माने (Shafali Verma) 40 आणि पूजा वस्त्रकर हिने नाबाद 30 धावांचे योगदान दिले. तसेच स्नेह राणा हिने 27 धावा केल्या. दुसरीकडे, बांगलादेशी फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांवर सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2022 09:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).