IND vs BAN 2nd Test Day 4 Live Score Update: दुसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव 285 वर घोषीत, जैस्वाल - राहुलीची शानदार अर्धशतके; Team India कडे 52 धावांची आघाडी
विराट कोहलीने 48 धावांचे योगदान दिले. रोहित शर्मा 23 धावा करून बाद झाला. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी 4-4 विकेट घेतल्या. हसन मोहम्मदला एक विकेट मिळाली.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर गारद झाला आहे. यानंतर भारताने पहिला डाव 9 विकेट गमावून 285 धावा करून घोषित केला आहे. टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध 52 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियासाठी केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या डावात अर्धशतके झळकावली. यशस्वीने 72 धावांची खेळी केली. राहुलने 68 धावा केल्या. विराट कोहलीने 48 धावांचे योगदान दिले. रोहित शर्मा 23 धावा करून बाद झाला. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी 4-4 विकेट घेतल्या. हसन मोहम्मदला एक विकेट मिळाली.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)