IND vs AUS 3rd Test 2024 Day 2 Live Score Updates: ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का; जसप्रीत बुमराहने घेतली मिचेल मार्श, ट्रॅव्हिस हेड यांची विकेट

जसप्रीत बुमराहने मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडला एकाच षटकात बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.

Photo Credit- X

Australia National Cricket Team vs India National Cricket Team Match Scorecard: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबर (शनिवार) पासून ब्रिस्बेन येथील द गाबा येथे खेळवला जात आहे. पावसामुळे पहिल्या दिवशी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवावा लागला. पहिल्या सत्रात केवळ 13.2 षटकांचा खेळ होऊ शकला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या. आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन आणि नॅथन मॅकस्वीनी यांच्या विकेट लवकर पडल्या कारण जसप्रीत बुमराहने 2 विकेट घेत त्यांचे कंबरडे मोडले आणि नितीश रेड्डीने 1 बळी घेतला परंतु ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शतके झळकावून डाव सांभाळला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट पडली. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडला एकाच षटकात बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.

ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)