SRH vs KKR IPL 2024 Final Toss Update: विजेतेपदाच्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
विजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघांना आपापल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरायचे आहे. या सामन्याद्वारे केकेआर तिसरे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल आणि हैदराबाद दुसरे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल.
SRH vs KKR IPL 2024 Final: आयपीएल 2024 चा अंतिम सामना (IPL 2024 Final) रविवार, 26 मे रोजी म्हणजे आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळला जाणारा हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. विजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघांना आपापल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरायचे आहे. या सामन्याद्वारे केकेआर तिसरे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल आणि हैदराबाद दुसरे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन
Final. Sunrisers Hyderabad Won the Toss & elected to bat https://t.co/lCK6AJCdH9 #TheFinalCall #TATAIPL #IPL2024 #KKRvSRH
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 26, 2024 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

