ENG vs AUS 2nd T20I Toss Update: दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेकचा कौल इंग्लंडच्या बाजूने, कांगारुला फलंदाजीसाठी केले अमंत्रित
पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडचा 28 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडला आता दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे.
England National Cricket Team vs Australia National Cricket Team : इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना (AUS vs ENG 2nd T20I) आज कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स येथे खेळवला जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडचा 28 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडला आता दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. इंग्लंडचा नियमित कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत फिलिप सॉल्ट संघाचे नेतृत्व करत आहे. तर ऑस्ट्रेलियाची कमान मिचेल मार्शच्या खांद्यावर आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर/कर्णधार), विल जॅक्स, जॉर्डन कॉक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, सॅम कुरन, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, साकिब महमूद, रीस टोपले
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, जोश इंग्लिस (विकेटीकपर), मार्कस स्टॉइनिस, टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, आरोन हार्डी, कूपर कोनोली, सीन ॲबॉट, ॲडम झम्पा
🔁 One change for Cardiff 🏟
We win the toss and bowl first! ⚪
🏴 #ENGvAUS 🇦🇺 | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) September 13, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 13, 2024 10:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

