Ireland vs South Africa 2nd ODI Live Toss Update: दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा निर्णय; पाहा प्लेइंग 11
तर टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत आहेत. आपली विजयी घोडदौड कायम राखत टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका आता मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल, तर आयर्लंडला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे.
Ireland National Cricket Team vs South Africa National Cricket Team 2nd ODI Match: आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर सायंकाळी 5 वाजल्यापासून खेळवला जाईल. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने आयर्लंडचा 139 धावांनी पराभव केला होता. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आयर्लंडची कमान पॉल स्टर्लिंगच्या खांद्यावर आहे. तर टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत आहेत. आपली विजयी घोडदौड कायम राखत टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका आता मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल, तर आयर्लंडला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. दरम्यान, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयर्लंड: अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), कर्टिस कॅम्फर, हॅरी टेक्टर, स्टीफन डोहेनी (विकेटकीपर), जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, अँडी मॅकब्राईन, गेविन होए, ग्रॅहम ह्यूम, क्रेग यंग.
दक्षिण आफ्रिका: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, ट्रिस्टन स्टब्स, काइल वॅरेने, विआन मुल्डर, अँडीले फेहलुकवायो, ब्योर्न फोर्टुइन, लिझाद विल्यम्स, लुंगी एनगिडी, ओटनीएल बार्टमन.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)