IND vs BAN 2nd Test Day 4 Live Update: दुसऱ्या डावात भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये, शकीबने उनाडकटला केले बाद
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला 5 वा मोठा धक्का बसला.
IND vs BAN 2nd Test: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिली कसोटी जिंकून टीम इंडियाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 4 विकेट गमावून 45 धावा केल्या होत्या. अक्षर पटेल 26 आणि जयदेव उनाडकट 3 धावा करून क्रीजवर उपस्थित आहेत. टीम इंडियाला अजूनही विजयासाठी 89 धावांची गरज आहे. बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या 231 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक 73 धावा केल्या. टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला 5 वा मोठा धक्का बसला. जयदेव उनाडकट 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम इंडियाचा स्कोर 56/5 आहे.