PAK vs BAN सामन्यात गद्दाफी स्टेडियमच्या फ्लड लाइटमध्ये बिघाड, थांबवावा लागला सामना, चाहत्यांनी केलं ट्रोल

गद्दाफी स्टेडियमच्या फ्लड लाइटमध्ये बिघाड झाल्याने सामना मध्यभागी थांबवावा लागला. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील आशिया चषक 2023 च्या सुपर-4 चा पहिला सामना तांत्रिक कारणामुळे थांबवावा लागला.

Floodlight Failure At Gaddafi Stadium: आशिया चषक सुपर-4 फेरीतील पहिला सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघ लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळत आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि 38.4 षटकात 193 धावांवर गारद झाला. बांगलादेशकडून यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने 87 चेंडूत सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार मारले. तर मुशफिकुर रहीम व्यतिरिक्त कर्णधार शकीब अल हसनने 57 चेंडूत 53 धावा केल्या. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हरिस रौफने सर्वाधिक 4 बळी घेतले. अशाप्रकारे पाकिस्तानसमोर विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला पाच षटकांनंतर माघारी परतावे लागले. वास्तविक, गद्दाफी स्टेडियमच्या फ्लड लाइटमध्ये बिघाड झाल्याने सामना मध्यभागी थांबवावा लागला. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील आशिया चषक 2023 च्या सुपर-4 चा पहिला सामना तांत्रिक कारणामुळे थांबवावा लागला. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now