IND vs BAN 3rd T20I Live Toss Update: शेवटच्या टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली, फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा प्लेइंग 11
दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 3rd T20I Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, तौहिद हृदयॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब
भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मयंक यादव