Sri Lanka vs New Zealand 1st Test Toss Update: पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेकचा कौल श्रीलंकेच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय

दोन्ही संघांमधील हा सामना सकाळी 10.00 वाजता गॉले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. श्रीलंकेचा संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. जिथे श्रीलंकेला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Sri Lanka vs New Zealand 1st Test Toss Update: पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेकचा कौल श्रीलंकेच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय
NZ vs SL (Photo Credit - X)

Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सकाळी 10.00 वाजता गॉले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. श्रीलंकेचा संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. जिथे श्रीलंकेला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ नुकताच एका कसोटी सामन्यासाठी भारतात आला होता. मात्र पावसामुळे कसोटी सामना रद्द करण्यात आला. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये रोमांचक कसोटी मालिका पाहायला मिळू शकते. तसेच, न्युझीलंड संघाची कमान टिम साउथीकडे आहे तर श्रीलंका संघाची कमान धनंजया डी सिल्वाकडे आहे. दरम्यान, श्रीलंकाने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याच निर्णय घेतला आहे.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम, डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (डब्ल्यू), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी (कर्णधार), एजाज पटेल, विल्यम ओरूरके

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (डब्ल्यू), दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कामिंदू मेंडिस, रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 18, 2024 10:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).