ENG vs AUS 1st T20I Toss Update: पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेकचा कौल इंग्लंडच्या बाजूने, कांगारुला फलंदाजीसाठी केले अमंत्रित

इंग्लंडने पहिल्या टी-20 साठी आधीच प्लेइंग 11 ची घोषणा केली. या मालिकेपूर्वीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत फिल सॉल्ट संघाचे नेतृत्व करेल. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्श कडे आहे.

ENG vs AUS 1st T20I Toss Update: पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेकचा कौल इंग्लंडच्या बाजूने, कांगारुला फलंदाजीसाठी केले अमंत्रित
ENG vs AUS (Photo Credit - X)

England National Cricket Team vs Australia National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील पहिला टी-20 सामना साउथॅम्प्टनच्या द रोझ बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. इंग्लंडने पहिल्या टी-20 साठी आधीच प्लेइंग 11 ची घोषणा केली. या मालिकेपूर्वीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत फिल सॉल्ट संघाचे नेतृत्व करेल. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्श कडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (कर्णधार/विकेटकीपर), विल जॅक्स, जॉर्डन कॉक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, सॅम करन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद, रीस टोपले

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2024 10:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).