PAK vs BAN Asia Cup 2023 Live Streaming: सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि बांगलादेश आमनेसामने, कधी-कुठे पाहणार सामना घ्या जाणून

हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांना विजेतेपदाच्या जवळ यायचे आहे.

BAN vs PAK (Photo Credit - Twitter)

आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) मधील गट टप्प्यातील फेरी संपली आहे आणि पाकिस्तान संघ सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशशी (PAK vs BAN) लढण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांना विजेतेपदाच्या जवळ यायचे आहे. दरम्यान, भारतातील आशिया कपचे मीडिया हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. टीव्हीवर, प्रेक्षकांना वेगवेगळ्या भाषांमधील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर याचा आनंद घेता येईल. तर ओटीटी वर, चाहत्यांना हॉटस्टारवर आशिया कपचे सर्व सामने पाहता येतील. यासोबतच तुम्हाला जिओ सिनेमावर भारतातील सामन्यांचे मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. आशिया चषकाचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होतील. टॉसची वेळ दुपारी 2.30 वाजता असणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)