England vs Australia 5th ODI Toss Update: अंतिम सामन्यात नाणेफेकचा 'कौल' ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, इंग्लंडला फलंदाजीसाठी केले आमंत्रित
दुपारी 3.30 वाजता सामना खेळवला जाईल. चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाने शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा 186 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंडने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे.
England National Cricket Team vs Australia National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ब्रिस्टल येथील काऊंटी मैदानावर होणार आहे. दुपारी 3.30 वाजता सामना खेळवला जाईल. चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाने शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा 186 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंडने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. आता निर्णायक सामना जिंकून मालिका जिंकून दोन्ही संघांना आपली सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, हॅरी ब्रूक (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, मॅथ्यू पॉट्स, ऑली स्टोन, आदिल रशीद
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, कूपर कोनोली, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)