India Champions Win WCL 2024: अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला चारली धूळ, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सच्या विजेतेपदावर कोरले नाव
शोएब मलिकने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर भारत चॅम्पियन्ससाठी अनुरीत सिंगने 3 बळी घेतले.
India Champions Beat Pakistan Champions In WCL 2024: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सच्या अंतिम सामन्यात भारत चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा पाच गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान चॅम्पियन्सने 156/6 धावा केल्या. शोएब मलिकने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर भारत चॅम्पियन्ससाठी अनुरीत सिंगने 3 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना, रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू यांच्या सलामीच्या भागीदारीमुळे भारतीय चॅम्पियन्सने चांगली सुरुवात केली आणि नंतर अर्धशतक झळकावले. रायुडूने 30 चेंडूत 50 धावा केल्या. पण भारतीय चॅम्पियन्सने मधल्या षटकांमध्ये सतत विकेट गमावल्या आणि ते थोडे अडचणीत आले. मात्र, अखेरीस युसूफ पठाणने भारताला दमदार फिनिश देत विजय मिळवला.
View this post on Instagram
A post shared by World Championship Of Legends | WCL (@worldchampionshipoflegends)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)