CSK vs GT सामन्यात चाहत्याने केला सुरक्षेचा भंग, थेट मैदानात येवुन MS Dhoni कडे घेतली धाव; माहीचे घेतले दर्शन (Watch Video)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सामनाच्यामध्ये महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) फलंदांजीला असताना एका चाहत्याने मैदानात येऊन त्याच्या पायाला स्पर्श केला.

Dhoni Fan in Ground: शुक्रवारी, इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 59 वा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या होम ग्राउंडवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 35 धावांनी पराभव केला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सामनाच्यामध्ये महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) फलंदांजीला असताना एका चाहत्याने मैदानात येऊन त्याच्या पायाला स्पर्श केला. चाहत्याने स्टेडियममधील सुरक्षेचा भंग केला आणि थेट एमएस धोनीकडे धाव घेतली जो ड्रेसिंग रूममध्ये चालला होता.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement