MI vs DC सामन्यात Rishabh Pant ने पंतग उडवण्याचा केला प्रयत्न, व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) सलामीला आले तेव्हा मैदानात एक अनोखी घटना घडली.

Kite On Ground: दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (MI vs DC) यांच्यातील सामन्यात, डीसीने प्रथम फलंदाजी करत 257 धावांची मोठी धावसंख्या उभारली. मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) सलामीला आले तेव्हा मैदानात एक अनोखी घटना घडली. लिझाद विल्यम्स दिल्लीसाठी पहिले षटक टाकायला आला. याच षटकात एक पतंग कुठूनतरी उडून मैदानात आली. या घटनेवर मैदानात उपस्थित लोकांनीही जोरदार गोंधळ घातला. पतंगाला मैदानाबाहेर नेण्यापूर्वी ऋषभ पंतनेही (Rishabh Pant) तो हवेत उडवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक ही घटना मुंबई इंडियन्सच्या डावातील पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूनंतर घडली. सोशल मीडियावर या घटनेने चाहत्यांना खूप मजा येत असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement