IND W vs AUS W, 18th Match Live Toss Update: भारत-ऑस्ट्रेलिया हायव्होलटेज सामन्यात नाणेफेकीचा कौल कांगारुच्या बाजूने, फलंदाजीचा घेतला निर्णय

आजचा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करायचे असेल तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND W vs AUS W, 18th Match Live Toss Update: भारत-ऑस्ट्रेलिया हायव्होलटेज सामन्यात नाणेफेकीचा कौल कांगारुच्या बाजूने, फलंदाजीचा घेतला निर्णय
IND W va AUS W (Photo Credit - X)

India Women's National Cricket Team vs Australia Women's National Cricket Team 18th Match: 2024 आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचा 18 वा सामना (2024 ICC Women’s T20 World Cup) आज भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) खेळवला जात आहे. ताहलिया मॅकग्रा या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तर टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली आहे. आजचा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करायचे असेल तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मूनी (विकेटकीपर), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), जॉर्जिया वेरेहॅम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट, डार्सी ब्राउन

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (क), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (डब्ल्यू), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2024 07:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).