ICC WTC 2021-23 Points Table: मोहाली कसोटीत विजय मिळवूनही टीम इंडियाची स्थिती जशास तशी, तर श्रीलंकेची मोठी घसरण; पहा गुणतालिकेत संघांची स्थिती

श्रीलंका संघाविरुद्ध मोठ्या विजय मिळवूनही पॉईंट टेबलमध्ये टीम इंडिया पाचव्या स्थानावर कायम आहे. तथापि या सामन्यापूर्वी नंबर एक क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेची घसरण झाली आहे. आणि आता ऑस्ट्रेलिया नंबर एक संघ बनला आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test, WTC Points Table: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान टीम इंडियाने (Team India) एक डाव व 222 धावांनी शानदार विजय मिळवला. दोन्ही संघातील दोन सामन्यांची मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) अंतर्गत खेळली जात आहे. श्रीलंका संघाविरुद्ध मोठ्या विजय मिळवूनही कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत टीम इंडिया पाचव्या स्थानावर कायम आहे. तथापि या सामन्यापूर्वी नंबर एक क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)