ICC Women's World Cup 2022: वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी साजरा केला भारताचा पराभव, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)

ICC महिला विश्वचषक 2022 च्या 28 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 3 गडी राखून पराभव करत टीम इंडियाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. भारताच्या पराभवानंतर वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. दरम्यान भारताच्या पराभवावर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी खूप आनंद साजरा केला. विंडीजच्या खेळाडूंचा आनंद साजरा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वेस्ट इंडिज महिला खेळाडूंचा जल्लोष (Photo Credit: Twitter)

ICC महिला विश्वचषक (Women's World Cup) 2022 च्या 28 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने  (South Africa) भारताचा 3 गडी राखून पराभव करत टीम इंडियाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. भारताच्या (India) पराभवानंतर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. दरम्यान भारताच्या पराभवावर वेस्ट इंडिजच्या (West Indies Women) खेळाडूंनी खूप आनंद साजरा केला. विंडीजच्या खेळाडूंचा आनंद साजरा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भारताच्या पराभवावर कॅरेबियन खेळाडू हॉटेलच्या खोलीत आनंदाने नाचू लागले. खेळाडू जोरात उड्या मारत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now