ICC Test Rankings: जेम्स अँडरसन पुन्हा टॉप-5 मध्ये, Mitchell Starc याचीही क्रमवारीत बढती
ICC Test Rankings: जेम्स अँडरसन आणि मिचेल स्टार्क यांनी या आठवड्यात मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर मोठ्या विजयानंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत महत्त्वपूर्ण उडी घेतली आहे. इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज अँडरसनने गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल 5 मध्ये पुनरागमन केले तर स्टार्कने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे.
ICC Test Rankings: वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आणि मिचेल स्टार्क (Mitchell Starc) यांनी या आठवड्यात अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीनंतर (Boxing Day Test) ताज्या ICC कसोटी क्रमवारीत मोठी प्रगती केली. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा एक डाव आणि 14 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी अजेय आघाडी घेतली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)