ICC T20 Ranking: शाकिब ठरला अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू, फलंदाजांमध्ये रिझवान आणि सूर्या यांच्यात टॉपसाठी रंजक लढत
शाकिब आता जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे.
आयसीसीने पुरुषांची टी-20 क्रमवारी जाहीर केली (ICC T20 Ranking) आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार शकीब अल हसनने (Shakib Al Hasan) T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 टप्पा सुरू होण्यापूर्वी जाहीर केलेल्या क्रमवारीत मोठा फरक केला आहे. शाकिब आता जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्याने अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीला मागे टाकले आहे. भारताचा विचार करता स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुसऱ्या स्थानी कायम असून विश्वचषकानंतर तो नक्कीच पहिलं स्थान मिळवू शकतो. पहिल्या स्थानाचा विचार करता पाकिस्तानता मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) नंबर 1 वर असून गोलंदाजांमध्ये जोश हेझलवुड विराजमान आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)