ICC T20 Ranking: शाकिब ठरला अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू, फलंदाजांमध्ये रिझवान आणि सूर्या यांच्यात टॉपसाठी रंजक लढत

शकीब अल हसनने (Shakib Al Hasan) T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 टप्पा सुरू होण्यापूर्वी जाहीर केलेल्या क्रमवारीत मोठा फरक केला आहे. शाकिब आता जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे.

ICC T20 Ranking: शाकिब ठरला अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू, फलंदाजांमध्ये रिझवान आणि सूर्या यांच्यात टॉपसाठी रंजक लढत
Shakib Al Hasan (Photo Credit - Twitter)

आयसीसीने पुरुषांची टी-20 क्रमवारी जाहीर केली (ICC T20 Ranking) आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार शकीब अल हसनने (Shakib Al Hasan) T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 टप्पा सुरू होण्यापूर्वी जाहीर केलेल्या क्रमवारीत मोठा फरक केला आहे. शाकिब आता जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्याने अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीला मागे टाकले आहे. भारताचा विचार करता स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुसऱ्या स्थानी कायम असून विश्वचषकानंतर तो नक्कीच पहिलं स्थान मिळवू शकतो. पहिल्या स्थानाचा विचार करता पाकिस्तानता मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) नंबर 1 वर असून गोलंदाजांमध्ये जोश हेझलवुड विराजमान आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2022 03:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).