ICC Player of Month: फेब्रुवारीच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी ‘या’ खेळाडूंना नामांकन; दोन महिला तर एका पुरुष भारतीय खेळाडूचा समावेश
‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’च्या पुरुष गटात यूएईचा वृत्य अरविंद, भारतीय श्रेयस अय्यर आणि नेपाळ क्रिकेटपटू दीपेंद्र सिंग आयरी यांना स्थान मिळाले आहे, तर महिला गटात न्यूझीलंडची प्रमुख अष्टपैलू अमेलिया केर, भारतीय दिग्गज फलंदाज मिताली राज आणि भारतीय संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा यांना नामांकन मिळाले आहे.
ICC Player of Month: भारतीय स्टार कर्णधार मिताली राज (Mithali Raj), अष्टपैलू दीप्ती शर्मा आणि श्रेयस अय्यर (Shreys Iyer) यांची ICC ने पुरुष व महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी फेब्रुवारी महिन्यातील खेळाडूंसाठी नामांकित केले आहे. महिला गटात न्यूझीलंडची अष्टपैलू अमेलिया केर, भारताची अनुभवी स्टार मिताली राज आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना नामांकन मिळाले आहे. तर पुरुष विभागात श्रेयस समवेत यूएईचा वृत्य अरविंद आणि नेपाळचा दीपेंद्र सिंग आयरी यांना नामांकित केले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)