ICC Men’s Test Team of the Year 2022: आयसीसीने निवडला 2022मधील सर्वोत्तम कसोटी संघ, 11 खेळाडूंमध्ये 'या' एकट्या भारतीय खेळाडूचे नाव

आयसीसीने 2022 कॅलेंडर वर्षात बॅट, चेंडू किंवा अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या पुरुष खेळाडूंचा कसोटी संघ निवडला आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवणारे क्रिकेट बोर्ड आयसीसीने कसोटी संघ जाहीर केला आहे. आयसीसीने 2022 कॅलेंडर वर्षात बॅट, चेंडू किंवा अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या पुरुष खेळाडूंचा कसोटी संघ निवडला आहे. खरं तर, 2022 आयसीसी पुरुष कसोटी संघ चकित करणारा आहे. कारण, यामध्ये भारताच्या फक्त एकाच खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आहे. आयसीसीने सन 2022मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.

पहा संघ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement