ICC ODI World Cup 2023: ईडन गार्डन्सवर भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यापूर्वी BCCI, CAB आणि Book My Show विरुद्ध FIR दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण

तक्रार मिळाल्यानंतर, कोलकाता पोलिसांनी त्वरीत कारवाई केली आणि आरोपी घटकांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला.

ICC ODI World Cup 2023

एका व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, कोलकाता पोलिसांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) आणि बुक माय शो यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. ईडन गार्डन्सवर ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बहुप्रतिक्षित भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यासाठी सर्वसामान्यांसाठी असलेली मोठ्या प्रमाणात तिकिटे काळ्या बाजाराच्या माध्यमातून गुपचूप वळवण्यात आल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित सामना बघू इच्छिणाऱ्या क्रिकेट चाहत्यांच्या तिकिटांच्या उपलब्धतेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. सामान्य लोकांना 5 नोव्हेंबरच्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्याची तिकिटे मिळत नाहीत. तक्रारकर्त्याने असा आरोप केला आहे की, बीसीसीआय, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल आणि बुक माय शोच्या काही अधिकार्‍यांनी सर्वसामान्यांसाठी असलेल्या तिकिटांचा एक मोठा भाग आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे.

तक्रार मिळाल्यानंतर, कोलकाता पोलिसांनी त्वरीत कारवाई केली आणि आरोपी घटकांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. यानंतर, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल आणि बुक माय शो या दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. आता यावर बीसीसीआय, बुक माय शो आणि कॅबकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहायचे आहे. (हेही वाचा: South Africa Beat New Zealand: दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा 190 धावांनी केला पराभव, केशव महाराजने चार गडी केले बाद)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now