MI vs SRH Live Streaming Online: हैदराबाद आणि मुंबई संघ विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी उतरणार मैदानात, इथे पहा लाईव्ह सामना
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.
इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये दररोज अनेक रोमांचक सामने खेळले जात आहेत. या भागात मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात सामना होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व जबरदस्त फॉर्ममध्ये सुरू असलेल्या एडन मार्करामकडे आहे. गेल्याच सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावले होते. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सची कमान रोहित शर्माच्या हाती आहे. गेल्या सामन्यात त्याने कर्णधारपद भूषवले नव्हते, तरीही या सामन्यात तो संघाचे नेतृत्व करू शकतो. दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल 2023 मधील 25 सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. तसेत तुम्ही Jio Cinema अॅपवर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)