Australia vs India, WCL 2024 2nd Semi Final: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स टूर्नामेंट 2024 अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही स्पर्धा इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन स्टेडियमवर खेळवली जात आहे. टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे सहा संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आज या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स आणि भारत चॅम्पियन्स यांच्यात होणार आहे. रात्री 9 वाजल्यापासून दोन्ही संघांमधील हा सामना रंगणार आहे. हा सामना भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्क्स आणि डिस्ने + हॉटस्टारवर थेट पाहता येईल. याशिवाय क्रिकेट चाहत्यांना फॅनकोड मोबाइल ॲप (Android, iOS) आणि टीव्ही ॲपवर थेट पाहता येणार आहे.
India Champions take on Australia Champions in the WCL semi-final today!
- Watch legends like Raina, Yuvi, Lee, Harbhajan, and Finch in action tonight. #WCL2024 pic.twitter.com/Xt2xlePfJ3
— Shamim Cricket. (@ShamimCricSight) July 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)