Hit and Run Case: हिट अँड रन अपघातामध्ये क्रिकेटर Suresh Raina च्या मामेभावाचा मृत्यू; आरोपीला अटक, गुन्हा दाखल

आता पोलीस आरोपींना पुन्हा कांगडा येथे आणत आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सुरेश रैना

Suresh Rainas Cousin Killed in Hit and Run: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रैनाच्या मामेभावासह दोन जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यात बुधवारी रात्री हा अपघात झाला. बुधवारी रात्री एका कारस्वाराने स्कूटरवरून जाणाऱ्या दोन तरुणांना चिरडले आणि घटनास्थळावरून पळ काढला, त्यापैकी एक रैनाच्या मामाचा मुलगा होता. घटनेची माहिती मिळताच कांगडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कार चालकाचा बाजारपेठेत पाठलाग करून त्याला अटक केली. आता पोलीस आरोपींना पुन्हा कांगडा येथे आणत आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती देताना एसपी कांगडा शालिनी अग्रीहोत्री यांनी सांगितले की, बुधवारी रात्री गग्गल पोलीस स्टेशन परिसरात हिट अँड रन प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. गागल येथील सौरभ आणि बनोई येथील शुभम अशी मृतांची नावे आहेत. (हेही वाचा: Tamil Nadu Accident Video: तामिळनाडूमध्ये भरधाव स्कूटर मॅनहोलच्या झाकणाला धडकली; दुचाकीवरील दोन महिला गंभीर जखमी)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)