Hit and Run Case: हिट अँड रन अपघातामध्ये क्रिकेटर Suresh Raina च्या मामेभावाचा मृत्यू; आरोपीला अटक, गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच कांगडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कार चालकाचा बाजारपेठेत पाठलाग करून त्याला अटक केली. आता पोलीस आरोपींना पुन्हा कांगडा येथे आणत आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
Suresh Rainas Cousin Killed in Hit and Run: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रैनाच्या मामेभावासह दोन जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यात बुधवारी रात्री हा अपघात झाला. बुधवारी रात्री एका कारस्वाराने स्कूटरवरून जाणाऱ्या दोन तरुणांना चिरडले आणि घटनास्थळावरून पळ काढला, त्यापैकी एक रैनाच्या मामाचा मुलगा होता. घटनेची माहिती मिळताच कांगडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कार चालकाचा बाजारपेठेत पाठलाग करून त्याला अटक केली. आता पोलीस आरोपींना पुन्हा कांगडा येथे आणत आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती देताना एसपी कांगडा शालिनी अग्रीहोत्री यांनी सांगितले की, बुधवारी रात्री गग्गल पोलीस स्टेशन परिसरात हिट अँड रन प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. गागल येथील सौरभ आणि बनोई येथील शुभम अशी मृतांची नावे आहेत. (हेही वाचा: Tamil Nadu Accident Video: तामिळनाडूमध्ये भरधाव स्कूटर मॅनहोलच्या झाकणाला धडकली; दुचाकीवरील दोन महिला गंभीर जखमी)
पहा पोस्ट-
टीम इंडिया के पूर्व स्टार आलराउंडर सुरेश रैना पर टूटा दुखों का पहाड़, हिट एंड रन केस में भाई की दर्दनाक मौत #died #accident #sureshraina #cricketnews https://t.co/mmpUV4u8lj
— Patrika Hindi News (@PatrikaNews) May 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 02, 2024 11:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

