Team Canada Qualified for T20 World Cup: कॅनडाच्या क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विजय, प्रथमच टी-20 विश्वचषकासाठी ठरले पात्र
कॅनडाच्या क्रिकेट संघाने यापूर्वी 50 षटकांच्या विश्वचषकात भाग घेतला आहे, परंतु 2011 पासून कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले नाही.
कॅनडाच्या क्रिकेट संघाने (Team Canada) शनिवारी हॅमिल्टनमध्ये बर्म्युडावर 39 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. कॅनडा प्रथमच टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) पात्र ठरला आहे. टी-20 विश्वचषकाची नववी आवृत्ती जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. कॅनडाच्या क्रिकेट संघाने यापूर्वी 50 षटकांच्या विश्वचषकात भाग घेतला आहे, परंतु 2011 पासून कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले नाही. पण आता संघ पहिला टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तुम्हाला माहिती आहेच की टी-20 वर्ल्ड कप 2007 मध्ये सुरु झाला होता. पहिली आवृत्ती एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने जिंकली होती. तेव्हापासून आतापर्यंत 8 वेळा टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)