Hardik Pandya : भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याचा बॉल बॉयसोबत सेल्फी; व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पून्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. चालू सामन्यात सीमारेषेवर असताना त्याने बॉल बॉयसोबत सेल्फी काढला. त्याचे हे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
भारत आणि बांगलादेशमध्ये (IND vs BAN) काल तिसरा टी 20 सामना खेळला गेला. कमालीची फटकेबाजी करत टीम इंडियाने सामना जिंकला. सामन्या दरम्यान, हार्दिक पांड्या (Hardik Pandya)सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी असताना त्याला एका लहान चाहत्याने सेल्फी मागितली. तेव्हा तात्काळ चालू सामन्यात हार्दिक पंड्याने पोझ देत बॉल बॉयसोबत सेल्फी काढला. एकदा नव्हे दोनदा पांड्या त्या चाहत्याकडे सेल्फीसाठी गेला.
हार्दिक पांड्याचा बॉल बॉयसोबत सेल्फी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)