ICC Men’s T20I All-Rounder Rankings: हार्दिक पांड्या बनला जगातील नंबरवन टी-20 अष्टपैलू खेळाडू, विश्वचषकातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे मिळाले बक्षीस

टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमधील चमकदार कामगिरीसाठी हार्दिकला बक्षीस मिळाले आहे.

Hardik Pandya (Photo Credt - X)

ICC T20I Ranking: आयसीसीने टी-20 क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार आणि स्टार खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे. ताज्या क्रमवारीत तो श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगासोबत संयुक्त नंबर वन बनला आहे. हार्दिकने दोन स्थानांनी प्रगती करत श्रीलंकेचा स्टार खेळाडू वानिंदू हसरंगाची बरोबरी केली आहे. टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमधील चमकदार कामगिरीसाठी हार्दिकला बक्षीस मिळाले आहे. अंतिम फेरीत हार्दिकने हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्या महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. हार्दिकने या स्पर्धेत बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी केली होती आणि तो टी-20 मध्ये जगातील नंबर वन अष्टपैलू बनणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)