IPL 2024: हार्दिक पांड्या Mumbai Indians मध्ये परतणार? ट्रान्सफर विंडो अंतर्गत होऊ शकतो ट्रेड

आयपीएल ट्रान्सफर विंडोची अंतिम मुदत 26 नोव्हेंबर आहे आणि गुजरात टायटन्स त्यांच्या कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडूसाठी किती मेहनत घेतील हे पाहणे मनोरंजक असेल.

भारतीय स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये पुनरागमन करणार आहे. दरम्यान, पंड्या आयपीएलच्या 17 व्या हंगामात त्याची जुनी फ्रेंचायझी मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians)  सामील होऊ शकतो, असे वृत्त आहे. आयपीएलमध्ये, गुजरात टायटन्सचा सध्याचा कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतू शकतो. पंड्याला मुंबई इंडियन्सला खरेदी केले जाण्याची शक्यता क्रिकेट विश्वात आहे. याचा अर्थ पंड्याचा जोफ्रा आर्चरसोबत व्यवहार होऊ शकतो. आयपीएल ट्रान्सफर विंडोची अंतिम मुदत 26 नोव्हेंबर आहे आणि गुजरात टायटन्स त्यांच्या कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडूसाठी किती मेहनत घेतील हे पाहणे मनोरंजक असेल. (हेही वाचा - IND vs AUS T20 Head to Head: भारत की ऑस्ट्रेलिया? टी-20 मध्ये कोणाचा वरचष्मा, जाणून घ्या आकडेवारी)

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement