IND vs AFG 2nd T20I Live Score Update: अफगाणिस्तानचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, मोहम्मद नबीला रवी बिश्नोईने केले बाद

भारतीय संघाने पहिला सामना जिंकून आतापर्यंतच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत आजही अफगाणिस्तानला हरवण्यात भारताला यश आले तर ते मालिका खिशात घालतील.

Team India (Photo Credit - Twitter)

IND vs AFG 2nd T20I: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium, Indore) खेळवला जात आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून आतापर्यंतच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत आजही अफगाणिस्तानला हरवण्यात भारताला यश आले तर ते मालिका खिशात घालतील. या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीही (Virat Kohli) संघात पुनरागमन केले आहे, अशा स्थितीत करोडो चाहत्यांची नजर कोहलीवर आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाला पाचवा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानचा स्कोर 109/5

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement