PAK vs NED World Cup 2023 Live Score Update: पाकिस्तानविरुद्ध नेदरलँड्सचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, हरिस रौफने एका षटकात घेतले दोन बळी
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. सध्याच्या विश्वचषकात पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील हा पहिला सामना आहे.
एकदिवसीय विश्वचषकाच्या (ICC Cricket World Cup 2023) दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानसमोर नेदरलँडचे (PAK vs NED) आव्हान आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. सध्याच्या विश्वचषकात पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील हा पहिला सामना आहे. नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला 286 धावांवर रोखले. बास डी लीडेच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तान संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने 75 चेंडूत 68 तर सौद शकीलने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर नेदरलँड्ससाठी बास डी लीडेने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. नेदरलँड्सचा स्कोर 137/5
- 4 wickets with the ball.
- Half century with the bat.
A fantastic All Round performance by Bas De Leede against Pakistan in the World Cup - he's the superstar of Netherlands unit. pic.twitter.com/5TdqRWSM1m
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 6, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2023 08:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

