IPL 2023, Match 13 GT vs KKR Live Update: गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा प्लेइंग इलेव्हन

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या मोसमात, जिथे गुजरात टायटन्सने त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये सहज विजय मिळवला आहे. त्याचवेळी कोलकाताला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.

IPL 2023, Match 13 GT vs KKR Live Update: गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा प्लेइंग इलेव्हन

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज दोन सामने होणार आहेत. सुपर संडेचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) यांच्यात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या मोसमात, जिथे गुजरात टायटन्सने त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये सहज विजय मिळवला आहे. त्याचवेळी कोलकाताला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, कोलकाताने दुसरा सामना मोठ्या फरकाने जिंकला. दरम्यान, नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सचा कर्णधार राशिद खानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

गुजरात टायटन्स : रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान (कर्णधार), मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल

कोलकाता नाइट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2023 03:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).